March 28, 2023
शेअर करा!

नूतन प्रशासक तथा आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी बोरवंड आज रोजी बोरवंड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी नवनियुक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी केली सदर ठिकाणी कामाला गती देऊन घनकचरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकारी यांना दिले.

नूतन आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी गुरूवार, दि़.०१ सप्टेंबर रोजी परभणी मनपा नूतन आयुक्त तथा प्रशासक पदाचा पदभार स्विकारला़ या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक देवीदास पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या प्रसंगी सर्व विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली व तसेच सर्व विभाग प्रमुखांच्या वतीने आयुक्त श्रीमती सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपायुक्त मनोज गग्गड, महेश गायकवाड, शहर अभियंता वासिम पठाण, आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, युनियन चे नेते के,के, आंधळे, अनुसयाबाई, के.के. भारसाखळे यांनी सत्कार केला. तसेच यांत्रिक विभागाचे प्रमुख मिरजा तनवीर बेग, आस्थापना विभागाचे मो. मंजूर, विद्युत विभागाचे मो.सोहेल सामि, पंकज देशमुख, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, साहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, नगरसचिव विकास रत्नपारखे, आरोग्य विभागाचे गजानन जाधव, अमोल जाधव, आदी णी सत्कार केला. आरोग्य विभाग मार्फत मावळते आयुक्त देविदास पवार यांचा फोटो भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाचे सामेल व राजकुमार जाधव यांनी केले. 

तसेच नूतन प्रशासक तथा आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी बोरवंड आज रोजी बोरवंड येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी नवनियुक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी केली सदर ठिकाणी कामाला गती देऊन घनकचरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकारी यांना दिले. तसेच कचऱ्यावर bio culture मारण्याचे सूचना दिले कचऱ्याचा वास येणार नाही व शेजारच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्या बाबत सूचना केले या वेळी उप आयुक्त श्री महेश गायकवाड घन कचरा व्यवस्थापन प्रमुख श्री मिर्झा तन्वीर बेग मुख्य स्व निरीक्षक करण गायकवाड स्व निरीक्षक श्रीकांत कुरा, विनय ठाकूर उपस्थित होते. या नंतर आज दिवसभर नूतन आयुक्तांनी शहरातील नागरिकाच्या समस्या व नागरिकांची भेट घेतली. नूतन आयुक्त श्रीमती सांडभोर यांनी शहरातील विकास करण्याचा अमृत 2 समांतर पाणी पुरवठा 155 कोटी मंजुरीसाठी पाठपुरवठा करणार, शहरातील नागरीका पर्यत सुविधा पुरविणा रनागरिकांचा सहभाग आवश्यक आहे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला कचरा सुका कचरा विलगीकरण करून घंटागाडी टाकावा असे आव्हान केले.


शेअर करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *