March 28, 2023

‘एएमएन’ माहिती

शेअर करा!

अप्रतिम विकास पत्रकारिता : विक्रमी उपक्रम
विकास पत्रकारितेचं अंग भवतालच्या वेगवेगळ्या समस्या व घटना लक्षात घेऊन अधिक प्रभावीपणे खुलत असतं. माध्यमे वेगवेगळी असली तरी समस्येतून सुटकेचा निश्वास आणि विकास प्रक्रियेला महत्त्व दिले जाते. कोरोना महामारी आणि बदलते जागतिक हवामान, स्थानिक पातळीवर निर्माण होणारी असंख्य आव्हाने या पार्श्वभूमीवर आता मात्र सर्वांनीच खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तशी ती पत्रकारांवरही मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. लोकशाहीतील अन्य सर्व घटकांशी सदैव संपर्कात असलेला हा ‘चौथास्तंभ’! एकूण व्यवस्थेत केंद्रस्थानी असलेल्या नागरिकाला नेहमी न्याय मिळाला पाहिजेत, यासाठी ‘प्रेस’ने आता शाश्वत विकासाचा आग्रह धरायला हवा. यासाठी महाराष्ट्रातील तमाम पत्रकार कशाप्रकारे आपले योगदान देऊ शकतात? यासाठी पत्रकार डॉ. अनिल फळे यांनी ‘अप्रतिम महावक्ता 2022 – 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने’ ही संकल्पना तयार केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पातळीवर जी शाश्वत विकास ध्येय निर्धारित केली आहेत. त्यानुसार संबंधित सर्व यंत्रणा योग्य ते काम करत आहेत की नाहीत? हे पत्रकारांनी अधिक डोळसपणे पहायला हवे. त्यासाठी ग्रामीण व शहरी वार्ताहरांनी अवलोकन, वस्तुनिष्ठ वृत्तांत, विश्लेषण याबरोबरच आता आपापल्या ठिकाणी राहून शाश्वत विकास ध्येयांवर आधारित स्थानिक समन्वय संयोजनाकडं वळले पाहिजेत आणि यासाठी ‘अप्रतिम महावक्ता – रेकॉर्ड ब्रेक पब्लिक टॅलेंट शो सिरीज’ हे प्रभावी माध्यम आहे ते कसं ते आपण पुढे समजून घेऊया.

शाश्वत विकास ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेसंबंधी जागृती व प्रत्यक्ष लोक सहभाग वाढविणे, हा ‘अप्रतिम महावक्ता’ या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अप्रतिम मीडियाने 2010-2011 मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात नागरिकांसाठी खुल्या स्पर्धा घेतल्या होत्या. आता तालुका पातळीवर किमान दहा प्रकारच्या स्पर्धा ‘अप्रतिम महावक्ता या मुख्य बॅनरखाली’ घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, स्पर्धक नागरिक आणि लोकप्रतिनिधी प्रशासन व संबंधित सर्व शासकीय- निमशासकीय संस्था, सामाजिक संस्था, सिविल सोसायटी यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जाणार आहे. यासाठी स्थानिक पत्रकारांचा पुढाकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कशाप्रकारे असेल या दृष्टीने  पत्रकार संस्था म्हणून अप्रतिम मीडियाने विशिष्ट आखणी केली आहे. अप्रतिम मीडिया कंपनीच्या ए एम न्यूज नेटवर्क या वृत्त एजन्सीच्या मार्फत अन्य सर्व प्रसार माध्यम संस्थांचा यामध्ये सहभाग असणार आहे. तसेच ए एम न्यूज नेटवर्कचे स्वतंत्रपणे पत्रकार प्रतिनिधी नेमले जाणार आहेत.

ए एम न्यूज नेटवर्क
ग्रामीण – शहरी वार्ताहरांसाठी सामाजिक-व्यावसायिक सुवर्णसंधी

अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क ही प्रसार माध्यम क्षेत्रातील मल्टी फंक्शनल मीडिया एजन्सी आहे. (www.apratimmedia.in) अप्रतिम मीडियाच्या AM News Network ही एजन्सी सर्व लहान-मोठी दैनिके, वृत्तवाहिन्या, वेब पोर्टल्स या सर्वांशी संबंधित आहे. मुक्त पत्रकार आणि तसेच अन्य कोणत्याही माध्यम संस्थेत काम करणारे पत्रकार अप्रतिम मीडियाच्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अप्रतिम महावक्ता (अर्थात तालुका पातळीवर चालणारा दशक भराचा विविध स्पर्धांचा उपक्रम) साठी माध्यम व्यावसायिक (Media Professional), तसेच शाश्वत विकास ध्येय केंद्रित दैनंदिन पत्रकारिता करण्यासाठी कोणीही अनुभवी किंवा अनुनभवी पत्रकार (Reporter) संपर्क करू शकतो. राजकीय, सामाजिक, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य व अन्य कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती, कार्यकर्ते, तज्ञ, विद्यार्थी, अध्यापक इत्यादी ‘सिटीझन जर्नालिस्ट’ Citizen Journalist) म्हणून सहभागी होऊ शकतात त्यांना ‘ए एम न्यूज नेटवर्क’ चे (AM News Network) प्रेस आय कार्ड दिले जाईल. यासाठी नोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. इच्छुकांनी आपला नोंदणी अर्ज भरावा.

अर्ज नोंदणीसाठी येथे या लिंक वर क्लिक करा-

'अप्रतिम महावक्ता 2022-2032 पब्लिक टॅलेंट रियालिटी शो' हा उपक्रम आणि पत्रकारांचा पुढाकार.. नेमका उपक्रम काय?

अप्रतिम महावक्ता ही केवळ वक्तृत्वाची स्पर्धा नसून तालुका पातळीवर अन्य किमान दहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सर्व नागरिकांसाठी या खुल्या स्पर्धा होणार असून विशेषतः 18 ते 35 वयोगटातील युवा नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पत्रकार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन, सामाजिक, संस्था इत्यादींच्या विविध प्रकारच्या योजना व उपक्रम यासंबंधी रिपोर्टिंग केले जाते. तेव्हा आता पत्रकारांनी अप्रतिम महावक्ता या विक्रमी जनसंवादासाठी स्थानिक पातळीवर समन्वयक म्हणून काम केले पाहिजेत. याविषयी अधिक माहिती व नेमके कशाप्रकारे पत्रकारांनी सहभागी व्हायचे आहे? या माध्यमातून काम करत असताना प्रासंगिकपणे केले जाणारे वृत्त संकलन व विश्लेषण हे ‘ए एम न्यूज नेटवर्क’ या पोर्टलवर तसेच ज्या ज्या दैनिक, वृत्तवाहिन्या वाहिन्यांशी करार केले जातील, त्या सर्व माध्यमातून प्रसारित केले जाईल.

पत्रकारांना प्रतिष्ठा... उत्पन्नही... कसे?

या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व स्थानिक व राज्य पातळीवरच्या पत्रकारांना समन्वयक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी आहे. या कामापोटी संबंधित निवडप्राप्त पत्रकारांना प्रतिष्ठेबरोबरच भरघोस उत्पन्न मिळेल, या दृष्टीने रचना करण्यात आली आहे. दरमहा वेतन व मानधन मिळणार नाही मात्र ‘एएम न्यूज नेटवर्क’ वृत्त एजन्सीच्या पुढाकारातून अन्य सर्व दैनिके वृत्तवाहिन्या व वेब पोर्टल आणि अप्रतिम मीडियाच्या स्वतंत्रपणे प्रकाशन व प्रसारण संबंधित जो जाहिरातींचा व्यवसाय केला जाईल, त्या पोटी कमिशन दिले जाईल आणि याशिवाय अन्य विशेष माध्यम प्रकल्पाद्वारे होणाऱ्या व्यवसायातून कमिशन दिले जाईल. आपले सध्याचे काम सुरू ठेवून पत्रकार दहा वर्षांच्या काळात प्रासंगिकपणे सहभागी होऊ शकतात. तसेच ज्यांना पूर्ण वेळ काम करावयाचे आहे, त्यांना  नियमित उत्पन्न मिळावे, यासाठी विशेष योजना आहेत. इच्छुक पत्रकारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एकूण प्रकल्पाविषयी व उत्पन्न विषयी विशेष प्रशिक्षणा दरम्यान अधिक माहिती दिली जाईल.  

सिटीझन जर्नालिस्ट 
या उपक्रमात कुणीही व्यावसायिक वकील, शिक्षक, विद्यार्थी पत्रकार, समाजसेवक व अन्य कोणत्याही प्रकारचा सुजाण नागरिक ‘ए एम न्यूज नेटवर्क’ चा चा सिटीझन जर्नालिस्ट म्हणून सहभागी होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा- 

आपल्या गावात शहरात राहून पत्रकार या नात्याने आपल्याला प्रभावीपणे काय कार्य करता येतील? पत्रकारितेच्या माध्यमातून जनसेवा ही सदैव चालूच असते त्याचबरोबर अर्धव्यवसायिक म्हणून आपल्याला उत्पन्नाची तेवढीच गरज असते, त्यामुळे अप्रतिम महावक्ताच्या माध्यमातून सामाजिक व व्यावसायिक सुवर्णसंधी प्रत्येक स्थानिक पत्रकाराला मिळू शकते, ती कशी यासाठी आपण आपली नोंदणी अवश्य करावी.

अर्ज नोंदणीसाठी येथे या लिंक वर क्लिक करा-

चौथास्तंभ पत्रकारिता पुरस्कार उपक्रम

अप्रतिम मीडियाने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण ते राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठे उपक्रम राबविलेले आहेत. गेल्या बारा वर्षांपासून स्थानिक पत्रकार ते संपादक मग ते प्रिंट इलेक्ट्रॉनिक व नव माध्यमातील असो ज्यांनी ज्यांनी स्पेशल स्टोरीज दिल्या आहेत तसेच कृषी, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, आर्थिक, यासारख्या व इतर बिट्सवर प्रभावीपणे वृत्त संकलन व विश्लेषण केले आहे त्यांच्यासाठी अप्रतिम मीडियाच्या वतीने चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.

अर्ज नोंदणीसाठी येथे या लिंक वर क्लिक करा-


शेअर करा!